सिंधुदुर्गात ‘कोल्हापूर’चा झेंडा

By Admin | Updated: January 29, 2015 00:32 IST2015-01-29T00:28:31+5:302015-01-29T00:32:47+5:30

पर्यटन महोत्सवात टिकारेंच्या लोगोची निवड

The flag of 'Kolhapur' in Sindhudurg | सिंधुदुर्गात ‘कोल्हापूर’चा झेंडा

सिंधुदुर्गात ‘कोल्हापूर’चा झेंडा

कोल्हापूर : सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवानिमित्त लोगो डिझाईन स्पर्धेत कोल्हापूरचे श्री ग्राफिक्सचे श्रीकांत टिकारे यांच्या लोगोची निवड करण्यात आली. मालवण येथे उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे.
जिल्हा नियोजन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचे लोगो निश्चित करण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी महाराष्ट्रातून ३०० जण सहभागी झाले होते. या निवडीने ‘निर्मिती’च्या अनंत खासबारदार यांच्यानंतर श्रीकांत टिकारे यांनी कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

Web Title: The flag of 'Kolhapur' in Sindhudurg