शिरोळ, जयसिंगपूर परिसरात ध्वजारोहण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:34+5:302021-02-05T07:04:34+5:30
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर पंचायत समिती कार्यालयासमोर पं. ...

शिरोळ, जयसिंगपूर परिसरात ध्वजारोहण उत्साहात
शिरोळ : येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, तर पंचायत समिती कार्यालयासमोर पं. स. सभापती कविता चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दत्त उद्योग समूहामध्ये उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नगरपालिकेत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट येथे मोहन माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तसेच शहरातील विविध शाळा, संस्थांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
अर्जुनवाड : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ व गोमटेश ग्रुप यांच्या वतीने प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्यदलातील जवानांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच ज्योती काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्व. भगवानराव घाटगे सोसायटी, स्व. आमाण्णा ककडे सोसायटी, चिंचवाड नागरी पतसंस्था, गोमटेश ग्रुप, श्री गोकुळ दूध सहकारी संस्था याठिकाणी ध्वजारोहण झाले.
फोटो - २७०१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.