महापालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST2021-02-05T07:17:19+5:302021-02-05T07:17:19+5:30

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी ...

Flag hoisting on the occasion of Republic Day in the Municipal Corporation | महापालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

महापालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रवींद्र आडसूळ, निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी देशभक्तीपर ‘जहॉ डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ हे गीत गायिले. तसेच भारताच्या संविधानामधील उद्देशिका याचे सामूहिक वाचन केले. व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करूया, अशी शपथ घेण्यात आली.

फोटो क्रमांक - २७०१२०२१-केएमसी ध्वजारोहण

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतील विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting on the occasion of Republic Day in the Municipal Corporation