नवे पारगाव परिसरात ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:27+5:302021-02-05T07:04:27+5:30
नवे पारगाव ग्रामपंचायतीत वैद्यकीय अधिकारी डॉ. जमादार, गर्ल्स हायस्कूलचे पंचायत समिती सदस्य सुलोचना देशमुख, पाराशर हायस्कूलमध्ये सरपंच प्रकाश देशमुख, ...

नवे पारगाव परिसरात ध्वजारोहण
नवे पारगाव ग्रामपंचायतीत वैद्यकीय अधिकारी डॉ. जमादार, गर्ल्स हायस्कूलचे पंचायत समिती सदस्य सुलोचना देशमुख, पाराशर हायस्कूलमध्ये सरपंच प्रकाश देशमुख, केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य हसन बारगीर, ग्रामीण रुग्णालयात प्राचार्य पी.बी. पाटील, मातंग समाजमंदिरात ग्रामपंचायत सदस्य उदय चाळके, बौद्ध समाजमंदिरात ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कांबळे, सदा गुरुजी वाचनालय ग्रामपंचायत सदस्य उदय चाळके, ऑइल मिल ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आंबेकर, प्राथमिक शाळा, चांदोली वसाहत उपसरपंच शुभदा पाटील, पाराशर नगरमध्ये ग्रामपंचायत सदस्य मेहबूब शिगावे, महात्मा गांधी मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. शिल्पा कोठावळे, दत्त नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब हुजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
जुने पारगाव येथील जुनी मराठी शाळा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील, ग्रामपंचायतीत उपसरपंच गणपती सिद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वारणा बालवाडीत ग्रामपंचायत सदस्या संगीता चिमटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. घुणकी ग्रामपंचायतीत सरपंच राजाक्का रासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
नवे चावरे ग्रामपंचायतीत सरपंच शारदा गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वाठारतर्फे वडगाव येथील वाठार ग्रामपंचायत प्रांगणामध्ये प्रशासक संतोष पवार यांच्या हस्ते, तर तळसंदे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच सावित्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अंबप ग्रामपंचायतचे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच बी.एस. अंबपकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाडळी ग्रामपंचायतीत प्रशासक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. मनपाडळे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण प्रशासक कांबळे यांच्या हस्ते केले.