बळिराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:45+5:302020-12-09T04:19:45+5:30
कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा ...

बळिराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तींचे बळ मिळाले आहे. यामुळे बळिराजाचा झेंडा केंद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरातील बिंदू चौक येथे पिठलं-भाकरी व सत्याग्रह आंदोलन केले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागते हे दुर्दैवी आहे. सर्व पिकांना हमीभाव निश्चित झाला पाहिजे. माजी आमदार संपतराव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, बाबूराव कदम, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, आदील फरास, प्रकाश गवंडी, सचिन पाटील, तौफीक मुल्लाणी, सुनील पाटील, श्रावण फडतारे, आदी उपस्थित होते.
चौकट
ढेकणे झाली म्हणून घर जाळू नका
व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम बाजार समिती आणल्या. कमी उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचा माल बहुराष्ट्रीय कंपनी खरेदी करणार नसल्याने बाजार समित्यांशिवाय पर्याय नाही. ढेकणे झाली म्हणून कोणी घर जाळत नाही, तर ढेकणाचा बंदोबस्त करणे हाच मार्ग असल्याचे शेट्टी यांनी सुनावले.
चंद्रकांत पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान
चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा कायदा वाचावा आणि मग चर्चेसाठी त्यांनी बिंदू चौकात यावे. ज्यांच्या नखाला माती लागली नाही, बांधावर कधी गेले नाहीत, त्यांनी शेतकरीहिताचे बोलू नये, असा टोला शेट्टी यांनी हाणला.
विनोद...