शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

संभाजीनगरात महापालिकेच्या टेम्पो खाली सापडून पाच वर्षांची चिमुरडी ठार; संतप्त जमावाकडून दगडफेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 15:18 IST

Kolhapur : अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होते. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

- तानाजी पोवार

कोल्हापूर : रस्त्याकडेला थांबलेल्या गॅस एजन्सीच्या टेम्पोचा दरवाजा चालकाने अचानक उघडल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीच्या हँडेलला टच झाले,  त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. पाठोपाठ पाठीमागून येणाऱ्या भरधाव महापालिकेच्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वडिलांसोबत निघालेली पाच वर्षाची चिमुरडी टेम्पोच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली. अन्वी विकास कांबळे ( रा. रायगड कॉलनी. मूळ रा. वारे वसाहत, संभाजीनगर) असे मृत झालेल्या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. अपघातात तिचे वडील विकास दिलीप कांबळे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर परिसरातील संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून महापालिकच्या टेम्पोचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अन्वी कांबळे व तिचे वडील विकास कांबळे हे दोघेजण दुचाकीवरून वारे वसाहत मधील मूळच्या घराकडून रायगड काँलनीतील घराकडे जात होते. दरम्यान, संभाजीनगरजवळ एका गॅस एजन्सी च्या दारात उभारलेल्या गॅस सिलेंडर भरलेल्या टेम्पोचा दरवाजा चालकाने अचानक उघडला. याच वेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीच्या हँडेलला दरवाजाचा धक्का लागल्याने दुचाकी खाली पडली. दरम्यान पाठीमागून आलेल्या महापालिकेच्या टेम्पोची दुचाकीला जोराची धडक लागली. दुचाकीवरील दोघेही टेंम्पोखाली सापडले. अन्वीच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर विकास कांबळे हे जखमी झाले. दरम्यान नागरिकांनी गर्दी जमा केली. टेम्पो एका बाजूने उचलून त्याखाली सापडलेल्या अन्वी व विकास यांना बाहेर काढले. नागरिकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अन्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या टेम्पो वर तुफान दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. अपघाताची घटना समजताच नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर