पुणे-बंगलोर महामार्गावर कार उलटून पाच गंभीर
By Admin | Updated: June 27, 2017 18:56 IST2017-06-27T18:56:11+5:302017-06-27T18:56:11+5:30
किणी टोल नाका येथील घटना

पुणे-बंगलोर महामार्गावर कार उलटून पाच गंभीर
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोल नाका येथे भरधाव कार उलटून पाचजण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. शिवकुमार मळगे (४९, रा. पुणे), अमर बाबूराव पाटील (वय ३२), नंदाराणी संतोष पाटील (२९), आदिती संतोष पाटील (९, सर्व, रा. कसबा वाळवा, ता. राधानगरी), अमर आनंदा पाटील (रा. करनूर, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, अमर पाटील हे पुणे येथे नोकरीला आहेत. सोमवारी ते कारमधून नातेवाईकांसह करनूर गावी येत होते. किणी टोलनाक्यावर येताच भरधाव कारवरील त्यांचा ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला उलटली. त्यामध्ये हे सर्वजण जखमी झाले. त्यांना या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी उदय बाळकू पाटील (रा. करनूर) यांनी सीपीआर पोलिसांत वर्दी दिली.