दहशत माजवल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:24 IST2021-04-21T04:24:46+5:302021-04-21T04:24:46+5:30
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, आरोपी विक्रम खंडारे याने आपल्या ताब्यातील आय,टेन गाडी क्र.एम.एच.०९,बी एम ७००९ ही गाडी भरधाव ...

दहशत माजवल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, आरोपी विक्रम खंडारे याने आपल्या ताब्यातील आय,टेन गाडी क्र.एम.एच.०९,बी एम ७००९ ही गाडी भरधाव वेगाने चालवून राहुल सावंत चार मामेभाऊ सुदेश बाळासो खबाले यांच्या अंगावर गाडी घालून गंभीर जखमी केले.
संशयित
आरोपी विक्रम लक्ष्मण खबाले, संग्राम राजेंद्र खबाले, विश्वजीत लक्ष्मण खबाले, करण संजय नालुगडे, सुयश उर्फ बाबूराव लक्ष्मण खबाले सर्व रा. हारुगडेवाडी या पाच जणांनी एक जमाव करून राहुल सावंत यांना धमकावून उत्तम खबाले यांच्या डोक्याला तलवार घालून गंभीर जखमी तर रामचंद्र सावंत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यात राहुल सावंत,उत्तम खबाले,सुदेश खबाले, रामचंद्र सावंत ,अक्षय हारुगडे,अजित पवार या सहा जणांना जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास सपोनि देशमुख हे करीत आहेत