रेंदाळ येथील शाळेतून पाच लाखांचे साहित्य गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST2021-02-20T05:13:37+5:302021-02-20T05:13:37+5:30

रेंदाळ येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलची इमारत आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने सन 2017-18 मध्ये ...

Five lakh materials missing from school in Rendal | रेंदाळ येथील शाळेतून पाच लाखांचे साहित्य गायब

रेंदाळ येथील शाळेतून पाच लाखांचे साहित्य गायब

रेंदाळ येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलची इमारत आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने सन 2017-18 मध्ये तळ मजला व पहिल्या मजल्यावर लोखंडी चॅनलचा आधार देऊन विद्यालयाच्या पूर्वेकडील जुन्या इमारतीचा व्हरांडा दुरुस्त केला होता. त्यासाठी ६८४४ किलो वजनाचे ४ लाख ७९ हजार ४८० रुपये किमतीचे लोखंडी साहित्य

खरेदी करण्यात आले होते. कालांतराने हे लोखंडी साहित्य काढले गेले. मात्र, त्यानंतर हे साहित्य कोठे गेले याबाबतची माहिती शाळा प्रशासनाकडे तोंडी, लेखी व माहिती अधिकारात वारंवार मागवूनसुद्धा त्याचा खुलासा अद्यापपर्यंत मिळत नाही. त्यामुळे या लोखंडी साहित्याचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे. या अपहारात माजी मुख्याध्यापक विष्णू सुबराव पाटील व विद्यमान मुख्याध्यापक संभाजी दत्तात्रय गंगापुरे हे सामील आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बांधकाम व सल्लागार समितीचे अध्यक्ष सचिन संभाजी मेथे यांनी

केली आहे.

--------::-------

Web Title: Five lakh materials missing from school in Rendal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.