कुरिअर कार्यालय फोडून पाच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:05+5:302021-04-16T04:25:05+5:30
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील एका कंपनीच्या कुरिअरचे कार्यालय फोडून चोरट्याने आतील पाच लाखांची रोकड लंपास केली. हा प्रकार ...

कुरिअर कार्यालय फोडून पाच लाख लंपास
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील एका कंपनीच्या कुरिअरचे कार्यालय फोडून चोरट्याने आतील पाच लाखांची रोकड लंपास केली. हा प्रकार बुधवारी (दि. १४) रात्री घडला. याबाबत गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, देवकर पाणंद येथील साई इस्टेट येथे ॲमेझॉन कुरिअर सर्व्हिसचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांनी हे कार्यालय नेहमीप्रमाणे बंद केले. यानंतर अज्ञात चोरट्याने बंद कार्यालयाच्या शटरचे कुलूप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. आतील ड्रॉवरमधील चावीचा वापर करून कपाट उघडले. त्यातील रोख चार लाख ८४ हजारांची रोकड आणि १४ हजारांचा डीव्हीआर हार्डडिस्कसह चोरून नेला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. फिरोज जमादार यांनी या चोरीची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.
-------