निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पाच लाख दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:42+5:302021-07-08T04:17:42+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावच्या अनुषंगाने लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या विविध घटकांकडून बुधवारी दिवसभरात सुमारे ५ लाख १४ हजार ...

Five lakh fines were levied on violators | निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पाच लाख दंड वसूल

निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पाच लाख दंड वसूल

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावच्या अनुषंगाने लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या विविध घटकांकडून बुधवारी दिवसभरात सुमारे ५ लाख १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे १५९९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या १४९४ जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या १४१६ वाहनांवर मोटर व्हेईकल ॲक्टखाली गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ३ लाख १० हजार ३०० रुपये दंड वसूल केला. तर १८३ दुचाकी वाहने जप्त केली. विनापरवाना अस्थापना सुरू ठेवल्याबद्दल ३२ जणांकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला.

Web Title: Five lakh fines were levied on violators