कागल तालुक्यात पाच कोविड केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:19+5:302021-05-19T04:24:19+5:30
कागल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कागल तालुक्यात रुग्णांची संख्या आटोक्यात असून एक शासकीय तर शासकीय मान्यतेने चार खासगी ...

कागल तालुक्यात पाच कोविड केंद्रे
कागल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कागल तालुक्यात रुग्णांची संख्या आटोक्यात असून एक शासकीय तर शासकीय मान्यतेने चार खासगी कोविड उपचार केंद्र सुरू आहेत. या पाच ठिकाणी मिळून सध्या ६१ ऑक्सिजन बेड आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णांच्या संख्येत ऑक्सिजन बेडची संख्या कमी असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापुरात जावे लागत आहेत.
खासगी दवाखान्यांच्या खर्चाचे आकडे एकूण आणि बघून सर्वसामान्य लोक आजार अंगावर काढत आहेत. शासकीय यंत्रणेलाही यामुळे चकवा दिला जात आहे.हे धोकादायक आहे.
येथील आर.टी.ओ चेक पोस्टनाक्यासाठी बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीत कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरे कोविड सेंटर गतवर्षी कागलात सुरू झाले. यावर्षीही ते सुरू आहे. येथे १७५ बेड असून त्यामध्ये १५ ऑक्सिजन बेड आहेत. येथे गर्दी झाल्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत खासगी डाॅक्टर अमर पाटील यांना नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा-सुविधा साहित्य देऊन दुसरे सेंटर सुरू केले. ते ही सध्या सुरू आहे. येथे वीस ऑक्सिजन बेड आहेत तर शाहू साखर कारखान्याचे वतीनेही चालूवर्षीं कोविड केअर सेंटर सुरू केले असून येथे ०६ ऑक्सिजन बेड आहेत. कागल शहरातील मगदूम हाॅस्पिटल आणि मुरगूड शहरातील जिजामाता हाॅस्पिटल या दोन खासगी दवाखान्यांत कोरोनावर उपचार करण्यात येतात.
कागल तालुक्यात ५७ जणांचा मृत्यू
कागल तालुक्यात या दुसऱ्या लाटेत आजपर्यंत १२८५ जणांना कोरोना झाला आहे. त्या पैकी सध्या ६३३ इतक्या रुग्णावर उपचार सुरू आहेत तर १२२८ इतके जण बरे झाले आहेत. यावेळी कागल मुरगूडमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ४२ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.