कोल्हापूरचे पाच पोलीस बनले उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:39+5:302021-02-24T04:27:39+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर ...

कोल्हापूरचे पाच पोलीस बनले उपनिरीक्षक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील पाच पोलीस कॉन्स्टेबल उत्तीर्ण झाले असून, ते पोलीस उपनिरीक्षक बनले.
लोकसेवा आयोगामार्फत २०१८ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये एकूण ३२२ जण उत्तीर्ण झाले. त्यात कोल्हापूर पोलीस दलातील पाच पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यामध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अभिजीत व्हारांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील रोहित खोत, विठ्ठल मनेकरी तसेच मुख्यालयातील महेश पाटील व लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील संग्राम पाटील यांचा समावेश आहे. या पाचही जणांची वैद्यकीय तपासणीनंतर लवकरच नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी रवानगी होत आहे.
फोटो नं. २३०२२०२१-कोल-अभिजीत व्हारांबळे(पीएसआय)
फोटो नं. २३०२२०२१-कोल-रोहित खोत(पीएसआय)
फोटो नं. २३०२२०२१-कोल-विठ्ठल मनेकरी(पीएसआय)
फोटो नं. २३०२२०२१-कोल-महेश पाटील(पीएसआय)
फोटो नं. २३०२२०२१-कोल-संग्राम पाटील(पीएसआय)