‘खुशी’ करणार सलग पाच तास पोहण्याचा उपक्रम
By Admin | Updated: December 9, 2014 23:17 IST2014-12-09T22:05:25+5:302014-12-09T23:17:06+5:30
उपक्रमांची नोंद घेण्यासाठी इंडिया बुक, आशिया बुकचे प्रतिनिधी, लिम्का बुकलाही निमंत्रित

‘खुशी’ करणार सलग पाच तास पोहण्याचा उपक्रम
कागल : मूळची कोल्हापूरची असणारी आणि सध्या पुण्यात इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेली खुशी अजित परमार (वय १२.६) ही उद्या, बुधवारी येथील पाझर तलाव बोटिंग क्लबमध्ये पाच तासांपेक्षा अधिक काळ सलगमणे पोहण्याचा उपक्रम करणार असून, या उपक्रमांची नोंद घेण्यासाठी इंडिया बुक, आशिया बुकचे प्रतिनिधी हजर रहाणार आहेत, तर लिम्का बुकलाही निमंत्रित केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.या उपक्रमाकरीता ती गेली गेली सहा महिने रोज चार ते पाच तास पुण्यातील निळू फुले जलतरण तलावावर, तर दर पंधरा दिवसांनी कागलमधील व्ही. ए. घाटगे बोटिंग क्लब येथे पोहण्याचा सराव करीत आहे.
खुशी परमारला स्क्युबा ड्रायव्हिंग (समुद्र-खाडीमध्ये पोहणे)चा परवाना गोवा येथील बॅराकोडा कंपनीने नुकताच प्रदान केला आहे. त्यानुसार मांडवा ते गेट आॅफ इंडिया हे मुंबई येथील समुद्रातील १८ कि.मी. अंतर ती यानंतर पोहणार आहे. उद्या सकाळी आठ वाजता या उपक्रमास कागलच्या बोटिंग क्लबवर सुरुवात होईल. यावेळी विविध मान्यवर उपस्थितीत रहाणार आहेत. यावेळी कृष्णाई वॉटर स्पोर्टसचे अध्यक्ष प्रा. नंदकुमार शिंदे, अजित परमार पौर्णिमा
परमार, विश्वराज शिंदे, सुयोग शिंदे, मारुती पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)