धोत्री गल्लीत चारचाकीची पाच वाहनांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:25 AM2021-05-09T04:25:44+5:302021-05-09T04:25:44+5:30

कोल्हापूर : रंकाळावेश बसस्थानकाकडून धोत्री गल्लीत भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यामध्ये विजया मुधोळकर ...

Five four-wheelers hit five vehicles in Dhotri lane | धोत्री गल्लीत चारचाकीची पाच वाहनांना धडक

धोत्री गल्लीत चारचाकीची पाच वाहनांना धडक

Next

कोल्हापूर : रंकाळावेश बसस्थानकाकडून धोत्री गल्लीत भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यामध्ये विजया मुधोळकर जखमी झाल्या. याप्रकरणी विजय जिरगे या संशयित मोटार चालकाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास एक भरधाव चारचाकी रंकाळा बसस्थानकाकडून धोत्री गल्लीतून जात होती. या चारचाकीने रस्त्याकडेला थांबलेल्या दुचाकींना धडक दिली, तर औषधे आणण्यासाठी निघालेल्या विजया मुधोळकर यांनाही चारचाकीची धडक बसल्याने त्या कोसळल्या. यादरम्यान पेट्रोलिंगसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता शेळके यांनी पोलीस गाडी आडवी उभी केली. तरीही तो चारचाकी चालक थांबला नाही. भरधाव वेगाने रेगे तिकटीकडे गेलेल्या या चारचाकीचा पाठलाग पोलीस अंमलदार इंद्रजित खडके, गृहरक्षक दलाचा जवान संदीप पाटील यांनी करीत चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फोटो : ०८०५२०२१-कोल-चारचाकी

ओळी : भरधाव वेगाने धोत्री गल्लीतून शनिवारी सायंकाळी जाणाऱ्या याच चारचाकीने पाच वाहनांना धडक दिली.

Web Title: Five four-wheelers hit five vehicles in Dhotri lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.