कोपार्डे येथे आजपासून पाच दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST2021-05-09T04:23:58+5:302021-05-09T04:23:58+5:30

कोपार्डे : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, रविवारपासून पाच दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रण ग्राम ...

Five days lockdown from today at Coparde | कोपार्डे येथे आजपासून पाच दिवस लॉकडाऊन

कोपार्डे येथे आजपासून पाच दिवस लॉकडाऊन

कोपार्डे : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, रविवारपासून पाच दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोना नियंत्रण ग्राम समितीने शनिवारी याबाबत कोपार्डे व कुंभी कासारी कारखाना परिसरात फिरून लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यासाठी जाहीर आवाहन केले.

कोपार्डे येथे मोठ्या प्रमाणात विविध व्यवसाय निर्माण झाले आहेत. यात तयार कपड्याचे व्यापारी, हॉटेल, किराणा, होजिअरी या व्यवसायांबरोबर इतर व्यवसायही वाढले आहेत. याचबरोबर येथील सांगरुळ फाटा परिसरात शेतीमाल, भाजीपाला विक्रीसाठी आजूबाजूच्या गावातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या समूह संसर्गाचा वाढता परिणाम व आजूबाजूच्या गावातील कोरोना रूग्णांची संख्या पाहता, दक्षता समितीने रविवारपासून बुधवार, १३ मेपर्यंत पाच दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. यासाठी व्यापारी, ग्रामस्थ व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन दक्षता समितीने केले आहे.

Web Title: Five days lockdown from today at Coparde