कोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:35+5:302021-05-09T04:24:35+5:30
कोडोली : कोडोलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रविवारपासून पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे, तर पॉझिटिव्ह ...

कोडोलीत पाच दिवस जनता कर्फ्यू
कोडोली : कोडोलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रविवारपासून पाच दिवसांसाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे, तर पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच उपचार न घेता संस्थात्मक अलगीकरणात ठेवणेबाबत निर्णय झाला. या काळात सर्व अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोडोली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाच दिवसांच्या काळात अत्यावश्यक सेवेत येणारे मेडिकल व कृषी औषध दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४.३० ते रात्री ८ पर्यंत सुरू असणार आहेत. रुग्णालयाच्या जवळ असणारे मेडिकल दुकाने मात्र २४ तास सुरू राहतील. दूध संकलन सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६.३० ते ८ या काळात फक्त सुरू राहणार आहेत. गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. परगावाहून येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करून आवश्यकता असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत पूर्ण नियंत्रण ठेवण्याकरिता ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे यांच्यजाकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. यावेळी सरपंच मनीषा पाटील, मोहन पाटील, नितीन कापरे, मानसिंग पाटील, बाजीराव केकरे, रणजित पाटील, अविनाश महापुरे, तलाठी अनिल पोवार, प्रभारी ग्रामसेवक माने आदी उपस्थित होते.