पाच कोटींचे रक्तचंदन जप्त

By Admin | Updated: January 23, 2015 00:53 IST2015-01-23T00:52:55+5:302015-01-23T00:53:11+5:30

पाचजणांना अटक : ट्रकसह दोन कार जप्त; निपाणीजवळ पोलिसांची कारवाई

Five crore rupees of bloodchine seized | पाच कोटींचे रक्तचंदन जप्त

पाच कोटींचे रक्तचंदन जप्त

निपाणी : केरळहून मुंबईकडे रक्तचंदन घेऊन जाणाऱ्या ट्रकसह दोन कार आणि पाच आरोपींना निपाणीत अटक करण्यात आली. या रक्तचंदनाचे वजन दहा टन असून, बाजारभावानुसार त्यांची किंमत पाच कोटी आहे. पोलिसांनी आज, गुरुवारी सायंकाळी निपाणी-मुरगूड रोडवरील लक्ष्मी पेट्रोलपंपावर ही कारवाई केली.
याप्रकरणी गुरमितसिंग महेंदरसिंग (वय ५६, रा. फातियाबाद), रशिद अब्बास (४६, कारतडका, मंगलोर), महंमदशरीफ हुसेन (४७, गुरुकट्टे, बेळतंगडी), युसूफ मुसा (३६, उप्पाला), इब्राहिम मैदू (५१, रा. होटगी रोड, सोलापूर, महाराष्ट्र) या संशयित आरोपींना अटक केली आहे, तर सोहेल नावाची व्यक्ती फरार आहे.
केरळ-मंगलोर मार्गे ट्रकमधून चंदनाचे लाकूड घालून वरच्या बाजूला निलगिरीचे सोट टाकून ट्रक मुंबईला जात होता. निपाणी पोलिसांना संशय आल्याने ट्रकचीझडती घेतली. त्यावेळी खालच्या बाजूला रक्तचंदनाची लाकडे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी चालक, क्लिनरला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता उर्वरित संशयितांची नावे ट्रकचालकांनी सांगितली.
चंदन वाहतूक करताना दोन कारमधून संशयित आरोपी निपाणीमधील एका लॉजवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारसह पाचजणांना ताब्यात घेतले.
बेळगावचे अतिरिक्त पोलीसप्रमुख बी. एस. न्यामगौडा, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक एस. आर. पाटील, निपाणीचे सीपीआय महेश्वर गौडा, फौजदार धिरज शिंदे, आदींनी कारवाई केली. (प्रतिनिधी

Web Title: Five crore rupees of bloodchine seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.