कृषी विभागाचे पाचट अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:28+5:302020-12-05T04:52:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उसाचा पाला जाळण्याऐवजी सरीत कुजविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी कृषी विभागाने पाचट ...

कृषी विभागाचे पाचट अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उसाचा पाला जाळण्याऐवजी सरीत कुजविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी कृषी विभागाने पाचट अभियान हातात घेतले. पाचट कुजविल्याने खत, पाण्याची बचत होणार असून, त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
लावण उसाची तोडणी झाल्यानंतर वाळलेला पाला जाळला जातो. त्यामुळे जमीन भाजून निघते. परिणामी खोडवा पिकाची उगवणही दबकतच होते. त्याऐवजी हा पाला एक सरी आड सरीत कुजविला तर त्याचे विविध फायदे मिळतात. यामुळे पाण्याची हेक्टरी एक ते दीड कोटी लिटरची बचत होते. भांगलणी व मशागतीचा खर्च निम्म्याने कमी होतो.
उमेश पाटील यांचे प्रभावी अभियान
सात-आठ वर्षांपुर्वी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी पाचट अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले होते. त्यांच्या अभियानाची दखल राज्य शासनाने घेतली होती. हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र पाचटयुक्त झाले होते.
पाचट न जाळण्याचे फायदे -
पाचट आच्छादनामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात निम्म्याने बचत.
ओलाव्याचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते, उसाची वाढ चांगली होती.
पाणी कमी लागल्याने हेक्टरी १०० ते १५० युनिट विजेची बचत
उसाच्या उत्पादनात एकरी ४ ते ६ टनांची वाढ
मोकळ्या सरीत हंगामानुसार वाटाणा, मूग, उडीद, आदी पिके घेता येतात.
कोट-
पाचट सरीत कुजविल्यास शेतकऱ्यांना खूप फायदा आहे. पाणी, मशागतीसह खतांच्या खर्चात बचत होणार असून, शेतकऱ्यांनी पाचट अभियानात सहभागी व्हावे.
- एन. एस. परीट (सहायक संचालक, ‘रामेती’, कोल्हापूर)
- राजाराम लोंढे