जातिवाचक शिवीगाळ, मारहाणप्रकरणी पाच अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:01+5:302021-06-10T04:18:01+5:30
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून जातिवाचक शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे घडली. याप्रकरणी सुधाकर नारायण कांबळे (वय ...

जातिवाचक शिवीगाळ, मारहाणप्रकरणी पाच अटक
कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून जातिवाचक शिवीगाळ करून हल्ला केल्याची घटना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे घडली. याप्रकरणी सुधाकर नारायण कांबळे (वय ३५, रा. बेघर गल्ली, कांडगाव) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले. करवीर पोलिसांनी आणकर कुटुंबातील पाच जणांना बुधवारी अटक केली.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी, बाजीराव शंकर आणकर, विशाल बाजीराव आणकर, राजाराम शंकर आणकर, कुलदीप आणकर, सुकुमार सर्जेराव आणकर (सर्व रा. कांडगाव, ता. करवीर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कांडगाव येथे आणकर आणि कांबळे कुटुंबीयांत जमिनीवरून वाद आहे. त्याबाबत यापूर्वी करवीर पोलिसांत दोन्ही कुटुंबांवरही अदखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सुधाकर कांबळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी त्यांनी बांधकामाचे साहित्य मागवले होते. मंगळवारी बांधकामासाठी चिरे विटा आणि खडी घराजवळ उतरण्याचे काम सुरू होते. त्यावेळी आणकर कुटुंबीयातील बाजीराव, विशाल, राजाराम, कुलदीप, सुकुमार यांनी जुना वाद उकरून काढून सुधाकर कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.