‘मनपा’चे पाच स्वीकृत सदस्य मतदानास मुकणार

By Admin | Updated: November 27, 2015 01:04 IST2015-11-27T00:54:39+5:302015-11-27T01:04:15+5:30

स्वीकृत सदस्यांबाबत...-विधान परिषद निवडणूक

Five approved members of 'NMC' will lose the polling | ‘मनपा’चे पाच स्वीकृत सदस्य मतदानास मुकणार

‘मनपा’चे पाच स्वीकृत सदस्य मतदानास मुकणार

कोल्हापूर : महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रियाच सुरू न झाल्याने विधान परिषद निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. आचारसंहितेमध्ये नवी निवड करता येत नसल्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रियाही लांबू शकते. महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरच्या प्रारंभी झाली. त्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया चुरशीची झाल्याने स्वीकृत सदस्य निवडीकडे दुर्लक्ष झाले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे स्वीकृत सदस्य निवडीपूर्वी सभागृहाचे गटनेते निश्चित होण्याची गरज असते. कारण हे गटनेते स्वीकृत सदस्यांची नावे महापालिका आयुक्तांना लेखी देतात व आयुक्त सर्वसाधारण सभेत त्याची घोषणा करतात. गट नेत्यांच्या निवडीला अजून विभागीय आयुक्तांनी रीतसर मान्यता दिलेली नाही. तोपर्यंत आचारसंहिता लागू झाल्याने स्वीकृत सदस्यांची निवड करण्यावरही बंधने आली. महापालिकेची सभा बोलविण्यासाठी किमान दहा दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. तोपर्यंत जिल्हा निवडणूक शाखेतर्फे आज, शुक्रवारी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला. आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवड होणे व त्यांचा मतदारयादीत समावेश होण्याचा मार्गच बंद झाला आहे.
महापालिकेतील सरासरी १६ सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य घेता येतो. त्या हिशोबाने काँग्रेस व भाजप-ताराराणी आघाडीस प्रत्येकी दोन व राष्ट्रवादीला एक असे पाच सदस्य स्वीकृत घेता येतात. स्वीकृत सदस्य निवडणारेच विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत धावत असल्याने या निवडीकडे दुर्लक्ष झाले आहे.


भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आम्ही आज, शुक्रवारी विधान परिषद निवडणुकीची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणार आहोत; परंतु मनपाकडून स्वीकृत सदस्यांची नावे प्राप्त झालेली नाहीत. शिवाय आचारसंहितेमुळे नवीन निवड करता येणार नसल्यामुळे या पाच सदस्यांचा मतदार यादीत समावेश होण्याची शक्यता नाही, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

Web Title: Five approved members of 'NMC' will lose the polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.