शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या मरगळलेल्या कुस्तीला ऊर्जितावस्था! येत्या शनिवारी पुन्हा शड्डू घुमणार; दिग्गज मल्ल भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 12:30 IST

हंगामातील पहिले कुस्ती मैदान

कोल्हापूर : कोल्हापूरच्या मरगळलेल्या कुस्तीला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शाहू छत्रपती यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या शनिवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानाच्या अनुषंगाने राजर्षी शाहू खासबाग मैदान सज्ज झाले आहे.

आखाड्यात लाल माती टाकण्यापासून बैठकीच्या जागेवरील गवत काढून मैदानावर प्रखर प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. हंगामातील पहिले कुस्ती मैदान शनिवारी (दि. ७) होत आहे. त्याची पूर्वतयारी, मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. कुस्ती मैदानाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या कामांची प्रशासक कादंबरी बलकवडे, संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी सायंकाळी संयुक्त पाहणी केली.मागील पाहणी दरम्यान प्रशासकांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून, केशवराव भोसले नाट्यगृह पश्चिम बाजूची संरक्षण भिंतीला तडे गेले होते त्या ठिकाणी दर्जा भरून घेण्यात आल्या आहेत. आखाड्यात नवीन माती टाकली आहे. मैदानाच्या दक्षिण बाजू व पश्चिम बाजूस संरक्षण भिंतीलगत मुरूम पसरणे व ज्या ठिकाणी बाजू खचली होती, ती लेव्हल करून घेण्यात आली आहे. मैदानावरील नावाचा बोर्ड कलर करून घेण्यात आला आहे. पैलवानांसाठी अंघोळीच्या सोयीसाठी शॉवर व प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे.अल्लादियाँ खा साहेब यांच्या पुतळ्याजवळील ग्रील दुरुस्ती, शोभेची झाडे व रंगरंगोटी करण्याचे काम करण्यात आले आहे. मैदान पश्चिम बाजू गेट कमान बाजूस वीट बांधकाम करून वहिवाट बंद करण्याचे काम चालू आहे. नाट्यगृह उत्तर बाजू गेट जवळ मुरूम टाकून लेवल व रॅम्पला काँक्रीट करण्यात आले आहे. मैदान दक्षिण बाजूस निखळलेला दगड बसवण्यात आला आहे.यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उप-शहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अर्जुन माने, शारंगधर देशमुख, विक्रम जरग, डॉ. विजय पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उदय फाळके, आशपाक आजरेकर उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती