सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:56+5:302021-09-14T04:29:56+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरू झाल्यानंतर इचलकरंजी शहरात पहिल्यांदा सोमवारी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे ...

सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण शून्यावर
इचलकरंजी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरू झाल्यानंतर इचलकरंजी शहरात पहिल्यांदा सोमवारी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहराची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू असल्याचे आशादायक चित्र आहे. मात्र, शहरवासीयांनी हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
सध्या शहरातील १६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर नऊ हजार १२५ रुग्ण बरे झालेले आहेत. काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या संक्रमित रुग्णांची संख्या तीन ते सहापर्यंत खाली उतरली आहे. त्यामुळे शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, लवकरच कोरोना संसर्गाची दुसरी लाटही संपुष्टात येईल, अशी आशा प्रशासन व नागरिकांतून व्यक्त होत आहे.
चौकट
नवीन रुग्णही नाही व रुग्णाचा मृत्यू नाही
इचलकरंजी शहरात आजतागायत नऊ हजार ५४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर कोरोनामुळे ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु सोमवारी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. २० फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या शून्यावर पोहोचली आहे.