‘गोकुळ’ निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुश्रीफ-महाडिक एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:40+5:302021-06-01T04:17:40+5:30

(हसन मुश्रीफ व महादेवराव महाडीक यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर सोमवारी पहिल्यांदाच ग्रामविकास मंत्री ...

For the first time since the Gokul elections, Mushrif and Mahadik have met | ‘गोकुळ’ निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुश्रीफ-महाडिक एकत्र

‘गोकुळ’ निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मुश्रीफ-महाडिक एकत्र

(हसन मुश्रीफ व महादेवराव महाडीक यांचे फोटो वापरावेत)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीनंतर सोमवारी पहिल्यांदाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार महादेवराव महाडिक हे एकत्र आले. जिल्हा बँकेच्या मासिक सभेच्या निमित्त होते, अध्यक्षांच्या दालनात तब्बल अर्धा तास उभय नेत्यांत चर्चा झाली.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व महाडिक हे आमनेसामने आले होते. त्यांनी एकमेकावर केलेल्या आरोप-प्रत्यारोपाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून गेेले होते. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते जिल्हा बँकेच्या मासिक सभेच्या निमित्ताने एकमेकांना भेटले. सभेपूर्वी वेळेतच महादेवराव महाडिक बँकेत आले, आले ते थेट अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या दालनात जाऊन बसले. या दोन नेत्यांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्यानंतर ‘महाडिकसाहेब अकरा वाजले मिटींगला जाऊया’ असे म्हणत मंत्री मुश्रीफ व महाडिक सभास्थळी एकत्र आल्याने इतर संचालक आचंबित झाले. संचालक मंडळात विविध विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांना तीन ते पाच लाख विमा संरक्षण देण्यासाठी ज्येष्ठ संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याबाबतच्या निर्णयाचे अधिकार अध्यक्ष मुश्रीफ यांनाच द्या, अशी महाडिक यांनी सूचना मांडली. त्यानंतर विकास संस्था सक्षमीकरणाचे अनुदान वितरण करताना शिरोली पुलाची विकास संस्थेचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने महाडिकसाहेबांनीच अनुदानाचा धनादेश स्वीकारावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्यानंतर उपस्थित संचालक मंडळाच्या भुवया उंचावल्या.

एकूणच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दोन्ही नेत्यात ताणलेले संबंध, आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर सभेत दोन्ही नेत्यातील सौहार्दपूर्ण संभाषणाची मात्र बँकेत जोरदार चर्चा सुरु होती.

Web Title: For the first time since the Gokul elections, Mushrif and Mahadik have met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.