अंबप ग्रामपंचायत महाआवास योजनेत तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:11+5:302021-09-09T04:31:11+5:30
नवे पारगाव : महाआवास अभियानात अंबप ग्रामपंचायतीने हातकणंगले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आमदार राजू आवळे यांच्याहस्ते ...

अंबप ग्रामपंचायत महाआवास योजनेत तालुक्यात प्रथम
नवे पारगाव : महाआवास अभियानात अंबप ग्रामपंचायतीने हातकणंगले तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. आमदार राजू आवळे यांच्याहस्ते व सभापती डॉ. प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सरपंच बी. एस. अंबपकर यांनी स्वीकारला.
जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी पंतप्रधान घरकुल, रमाई घरकुल योजनेत जास्तीत जास्त गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामपंचायतीने अंबप गावात नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करून घेतली. अनुदान तत्काळ मिळावे यासाठी योजनेचे काम प्रभावीपणे राबविले. त्यामुळे अंबपने महाआवास योजनेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. या योजनेतून उत्कृष्ट पद्धतीने घर बांधल्याबद्दल आदर्श घरकुलचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागनाथ पांडुरंग कांबळे यांना, तर दि्वतीय क्रमांकाचा पुरस्कार अंबपच्या मंगल मारुती कांबळे यांना मिळाला.
यावेळी उपसरपंच बाळासोा माने, सदस्य राजेंद्र माने, कृष्णात गायकवाड, सोनाली जाधव, माधुरी कांबळे, सलमा मुल्ला, ग्रामविकास अधिकारी मुसळे उपस्थित होते.
फोटो : ०८ अंबप पुरस्कार
हातकणंगले तालुक्यात महाआवास योजनेतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अंबप ग्रामपंचायतीला मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांच्याहस्ते सरपंच बी. एस. अंबपकर यांचा सत्कार केला. यावेळी विजयसिंह माने, संतोष उंडे, रोहित निलजे उपस्थित होते.