शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पहिल्या फेरीत ‘केआयटी’ महाविद्यालयाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:02 AM

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाली.

ठळक मुद्देपहिल्या फेरीत ‘केआयटी’ महाविद्यालयाला पसंतीअभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थी, पालकांची गर्दी

कोल्हापूर : अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये खासगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया सुरू झाली.राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची अधिकृत यादी बुधवारी (दि. १०) सायंकाळी जाहीर झाली. त्यामध्ये विनाअनुदानित व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘केआयटी’ला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले. ‘केआयटी’च्या ६७४ पैकी ६१० जागांवर विद्यार्थी पसंती मिळाल्याने या महाविद्यालयाची अलॉटमेंट जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

याबाबत ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश प्रक्रियेत कमी नोंदणीचे चित्र असल्याचे दिसत असताना ‘केआयटी’चा हा आकडा समाधानपूर्वक वाढला आहे. नव्याने सुरू झालेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व फक्त ‘केआयटी’मध्ये असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग व एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंग या विद्याशाखांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

पहिला प्रवेश घेतलेल्या अनुप अरुण शिर्के (रा. लोणंद, जि. सातारा) या विद्यार्थ्यांचे उपाध्यक्ष कुलकर्णी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी दीपक चौगुले, विश्वस्त डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, अधिष्ठाता डॉ. एम. एस. चव्हाण, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. दि. जे. साठे, प्रवेश प्रक्रिया आयोजक समीर नागटिळक, प्रा. विजय रोकडे, आदी उपस्थित होते.

मुदत उद्यापर्यंतप्रवेश निश्चितीसाठी महाविद्यालयात दिवसभर पालक, विद्यार्थ्यांची गर्दी होती. पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित करण्याची मुदत उद्या, रविवारपर्यंत आहे, अशी माहिती उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली.

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर