शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

गोकुळमधील सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:16 IST

GokulMilk Kolhapur : गोकुळच्या प्रचारातील मुख्य मुद्दा टँकरचे वाहतूक भाडे ठरल्याने सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर पडणार आहे. सध्या दूध वाहतुकीसाठी १५० टँकर असून या टँकरचा दूध वाहतूक करार चार-पाच महिन्यांत संपत आहे. त्यानंतर यातील किमान १३० टँकर बंद होणार, हे निश्चित आहे. संचालकांच्या मर्जीतील व गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या व संघाच्या कामापेक्षा राजकारणात रस असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. या कर्मचाऱ्यांसह कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह पुणे व मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी हिट लिस्टवर आहेत.

ठळक मुद्दे संचालकांच्या मर्जीतील कर्मचारी धास्तावले घाणेकरांसह तीन अधिकारी हिट लिस्टवर

राजाराम लोंढेकोल्हापूर : गोकुळच्या प्रचारातील मुख्य मुद्दा टँकरचे वाहतूक भाडे ठरल्याने सत्तांतरानंतर पहिला हातोडा टँकरवर पडणार आहे. सध्या दूध वाहतुकीसाठी १५० टँकर असून या टँकरचा दूध वाहतूक करार चार-पाच महिन्यांत संपत आहे. त्यानंतर यातील किमान १३० टँकर बंद होणार, हे निश्चित आहे. संचालकांच्या मर्जीतील व गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून बसलेल्या व संघाच्या कामापेक्षा राजकारणात रस असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. या कर्मचाऱ्यांसह कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्यासह पुणे व मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी हिट लिस्टवर आहेत.राजकीय पदासाठी नेहमीच चढाओढ असते. मात्र ह्यगोकुळह्णची सत्ता व संचालक पदाची गोडी काही औरच आहे. त्याला टँकर, स्थानिक दूध वाहतुकीचे टेंपो, दूध वितरणाची एजन्सी आदी बाबी कारणीभूत आहेत. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीचे नेते हे मुद्दे घेऊनच सभासदांच्या दारात गेले. दूध संघातील केवळ टँकरचे टेंडर बदलले, तर लिटरला एक रुपया जादा दर देणे सहज शक्य होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले आहे.

सत्तांतरानंतर अंतर्गत हालचाली पाहता, नेते व संचालकांच्या टँकरवर पहिला हातोडा टाकला जाणार आहे. संघात नेत्यांसह संचालक व त्यांच्या नातेवाईकांचे १५० टँकर आहेत. आता सत्तेत आलेल्या आघाडीतील तीन संचालकांचे सुमारे २० टँकर आहेत. दूध वाहतुकीचा टँकर मालकाशी पाच वर्षांचा करार आहे. त्याची मुदत २०२१ मध्ये संपत आहे. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यात हे टँकरचे ठेके बदलले जाणार, हे निश्चित आहे.टँकरशिवाय संघातील अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर नवीन संचालकांचा राग आहे. सर्वसाधारण सभेला कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना हटवा, सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे काम काय? अशी विचारणा विरोधी गटाने केली होती. डी. व्ही. घाणेकर यांच्यासह पुणे व मुंबईतील वरिष्ठ अधिकारी हिट लिस्टवर आहेत. घाणेकर सेवानिवृत्त होऊन दोन वर्षे झाली. त्यात सत्तांतर झाल्याने ते स्वत:हून पदावरून बाजूला होण्याची शक्यता आहे.

संचालकांच्या मागे-पुढे करणाऱ्या व गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. गोकुळच्या कामापेक्षा राजकारणात रस असलेले काही कर्मचारीही आहेत. गोकुळसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुकीत थेट प्रचारातही काही पुढारी कर्मचारी सक्रिय होते. हेही कर्मचारी हिट लिस्टवर आहेत.फार्म हाऊस, घरातील कर्मचारी गोकुळात येणारगोकुळमध्ये अनेक वर्षे सत्तेत असलेल्या संचालकांनी संघाच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. काही संचालकांचे फार्म हाऊस व घरात गोकुळचे कर्मचारी काम करतात. काम संचालकाचे आणि पगार दूध संघाचा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा गोकुळात यावे लागणार आहे.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर