गुडाळेश्वर स्पोर्टस् कबड्डी स्पर्धेत प्रथम
By Admin | Updated: January 16, 2015 00:13 IST2015-01-16T00:07:58+5:302015-01-16T00:13:35+5:30
कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते.

गुडाळेश्वर स्पोर्टस् कबड्डी स्पर्धेत प्रथम
दिंडनेर्ली : कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने झालेल्या ५५ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये गुडाळेश्वर स्पोर्टस् गुडाळ (ता. राधानगरी) यांनी प्रथम क्रमांक मिळवून ‘एफ ३ युवा चषक’ पटकाविला. दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. यामध्ये द्वितीय क्रमांक हिंदवी स्पोर्टस् कौलव, तृतीय क्रमांक एकता शाहू तारळे, चतुुर्थ शिवमुद्रा कौलव, आदी संघांनी यश संपादन केले. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व शिल्ड देण्यात आले. दिंडनेर्ली येथील ‘एफ ३ युवा मंच’च्यावतीने या स्पर्धा भरविल्या होत्या. बक्षीस वितरण दिंडनेर्लीचे सुपुत्र निवृत्त ले. जनरल एम. एन. काशीद, बिभीषण पाटील, रजिगरे गुरुजी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंच म्हणून क्रीडा शिक्षक यु. डी. जाधव, एस. एस. वाडकर, संभाजी गावडे, संदीप चरापले, टी. बी. पाटील, आदींनी काम पाहिले. निवेदक म्हणून सुहास पाटील, आर. ई. पाटील, युवराज पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच महादेव पाटील, माजी सरपंच शांतिनाथ बोटे, सदस्य दत्तात्रय वाडकर, सर्जेराव काळुगडे, तसेच एफ ३ युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.