गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST2020-12-26T04:18:56+5:302020-12-26T04:18:56+5:30

धामोड : खामकरवाडी (ता .राधानगरी) येथील विलास लहू हळदे यांचा ट्रॅक्टर येथील बळवंत विठ्ठल भिऊंगडे यांचे ...

Fire the tractor trolleys filled with grass | गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस आग

गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस आग

धामोड : खामकरवाडी (ता .राधानगरी) येथील विलास लहू हळदे यांचा ट्रॅक्टर येथील बळवंत विठ्ठल भिऊंगडे यांचे गवत घेऊन कोतेमार्गे खामकरवाडीकडे येत होता. दरम्यान, कोते येथील गोठणाजवळ हा ट्रॅक्टर आला असता ट्रॉलीमध्ये भरलेल्या गवताचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाल्याने शॉर्टसर्किट झाले व ट्रॉलीतील गवताने अचानक पेट घेतला. ही बाब ट्रॅक्टर चालक विक्रम हळदे याच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून ट्रॅक्टर वेगळा केला. त्यामुळे जीवितहानी टळली.

पण ट्रॉलीत भरलेल्या गवताच्या दोन हजार पेंंड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

फोटो ओळी - कोते (ता. राधानगरी) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमुळे ट्रॉलीतील संपूर्ण गवत जळून खाक झाले.

छाया : श्रीकांत ऱ्हायकर (धामोड)

Web Title: Fire the tractor trolleys filled with grass