शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातील ‘सिंथेटिक ट्रॅक’ परिसरात आग, स्वच्छत करताना घडला प्रकार; कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:21 IST

शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.

ठळक मुद्देआग आटोक्यात आणण्यासाठी विद्यापीठ कर्मचारी, विद्यार्थ्यांची उडाली धावपळ मैदानी स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून ट्रॅक भाडेतत्त्वावर अहवाल कुलसचिवांना सादर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली.या ट्रॅकवर शनिवार (दि. २) पासून मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संयोजकांनी शिवाजी विद्यापीठाकडून हा ट्रॅक भाडेतत्त्वावर वापरण्यास घेतला आहे. त्याच्या स्वच्छतेचे काम संयोजकांनी एका ठेकेदाराला दिले आहे.

याअंतर्गत स्वच्छतेचे काम सुरू आहे. ट्रॅक परिसरातील वाळलेल्या गवत नष्ट करण्यासाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या एकाने येथील गवत पेटविले. या गवताला लागलेली आग काही क्षणात ट्रॅकच्या परिसरात वेगाने पसरली.

आग लागलेल्या ठिकाणाहून पाच ते सहा मीटर सिंथेटिक ट्रॅक होता. त्याचे नुकसान होवू नये म्हणून याठिकाणी स्वच्छतेसाठी कार्यरत असलेल्या कामगारांसह विद्यापीठाचे कर्मचारी, काही विद्यार्थ्यांनी आगीवर तातडीने पाणी मारले आणि पुढील नुकसान टाळले.

दरम्यान, या स्पर्धेसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून या ट्रॅकच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या घडलेल्या प्रकाराची माहिती आणि अहवाल कुलसचिवांना सादर केला असल्याचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :universityविद्यापीठfireआग