कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:02 PM2020-08-26T13:02:03+5:302020-08-26T13:07:24+5:30

कोडोली ता पन्हाळा येथील वारणानगर कोडोली मार्गावर भारत गॅससमोर असलेल्या संजीवनी सुपर बझारला मंगळवारी मध्ये रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

Fire at Super Bazaar at Kodoli, loss of Rs 4 lakh | कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान

कोडोली येथे सुपर बझारला आग, चार लाख रुपयांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देकोडोली येथे सुपर बझारला आगचार लाख रुपयांचे नुकसान

कोडोली : कोडोली ता पन्हाळा येथील वारणानगर कोडोली मार्गावर भारत गॅससमोर असलेल्या संजीवनी सुपर बझारला मंगळवारी मध्ये रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे लागलेली आग लक्षात आल्याने ती लगेच विझवण्यात यश आले. आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. यात सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले.

येथील जीवन रोकडे यांचा संजीवनी सुपर बझार आहे. लॉकडाऊनमुळे हा बझार सायंकाळी सात वाजता बंद केला होता. रात्री दहाच्या सुमारास या बझारमधून धूर येत असल्याचे शेजारच्या लोकांच्या लक्षात आले.

नागरिकांनी व आझाद गल्लीतील स्थानिक नागरिकांनी महामंडळास माहिती देवून विद्युत पुरवठा बंद केला व शटर उचकटून आत प्रवेश केला. नागरिकांनी जळत असलेल्या मालावर पाणी मारुन आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी वारणा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन बंब तात्काळ आला. त्यांनी आग विझवण्यास मदत केली. यात अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा अंदाज समजेल.

Web Title: Fire at Super Bazaar at Kodoli, loss of Rs 4 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.