यड्रावमध्ये कपडे निर्मिती उद्योगाला आग​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:39+5:302021-04-28T04:24:39+5:30

​ यड्राव : येथील पार्वती​ औद्योगिक वसाहतमधील एन.आर. इंटरप्राईजेस या कपडे निर्मिती उद्योगाला सकाळी साडेनऊच्या सुमारास​ शॉर्टसर्किटने आग ...

Fire in garment industry in Yadrav | यड्रावमध्ये कपडे निर्मिती उद्योगाला आग​

यड्रावमध्ये कपडे निर्मिती उद्योगाला आग​

यड्राव : येथील पार्वती​ औद्योगिक वसाहतमधील एन.आर. इंटरप्राईजेस या कपडे निर्मिती उद्योगाला सकाळी साडेनऊच्या सुमारास​ शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची नोंद शहापूर​ पोलीस ठाण्यात झाली आहे.

​ ​ ​ ​ ​यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये सुशील मानधना यांच्या मालकीचा​ एन. आर. इंटरप्राईजेस (मानधना) या नावाचा कारखाना आहे. या ठिकाणी कपडे व बेडशीट निर्मिती करण्यात येते. सध्या लॉकडाऊन​ सुरू असल्याने हा कारखाना बंद आहे.

कंपनीचे चालक सकाळी साडेनऊ वाजता कंपनीमध्ये गेले असता त्याना मुख्य कार्यालयातून​ धूर व​ आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती मालकांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर नगरपालिका व संजय घोडावत ग्रुप या दोन अग्निशमन​ दलाला पाचारण करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. या आगीत कार्यालयातील संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, सिलिंग व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

फोटो ओळी : यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील एन. आर .एंटरप्राइजेस या उद्योगाच्या कार्यालयाचे आगीमुळे नुकसान झाले.

Web Title: Fire in garment industry in Yadrav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.