शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुदनूरमधील आगीत साॅमिल, ऑईल मिल-फॅब्रिकेटर्स कारखाना खाक, अंदाजे ७० लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:55 IST

नववर्षारंभी सुतार कुटुंबावर कोसळले मोठे संकट

निंगाप्पा बोकडेचंदगड: साॅमील, ऑईल मिल व फॅब्रिकेटर्स कारखान्याला रविवारी चारच्या सुमारास आग लागून अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना कुदनूर येथे घडली. नववर्षाच्या आरंभीच या घटनेमुळे सुतार कुटुंबावर मोठं संकट कोसळेल आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार, गजानन सुतार, तुकाराम सुतार, दिलीप सुतार व जानबा सुतार यांच्या मालकीच्या सिद्धेश्वर सॉमिल, सिद्धेश्वर ऑईल मिल व शिवराम फॅब्रिकेटर्स यानावाने मोठा व्यवसाय सुरू केला होता. ही तिन्ही ठिकाणं लागून असल्याने सर्वच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. कारखान्यात ठेवलेल्या दोन दुचाकी ही जळून खाक झाल्या असून बांधलेल्या दोन बकरीही होरपळून गेल्या. कारखान्यांना लागलेल्या भीषण आगीत अंदाजे सुमारे ७० लाखांचे नुकसान झाले. या आगीत कारखान्यात बांधलेली दोन बकरी व दोन मोटर सायकलही जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लाकूड व तेल साठल्यामुळे भीषण आग लाकूड व तेल साठ्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. गडहिंग्लज नगर परिषदेचा अग्निशमक बंब येईपर्यंत तिन्ही कारखाने आगीच्या भक्षस्थानी पडले होते. लाकूड व तेलाच्या साठ्यामुळे आग भीषण होती. यावेळी ग्रामस्थांनीही जीवाची बाजी लावत आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आत गॅस सिलेंडर असल्याचे समजल्यामुळे यावरही भीतीमुळे मर्यादा आल्या. तिन्ही कारखान्यांची मशिनरी, विद्युत मीटरसह मोठा लाकूड साठा, तेल काढण्यासाठी आणलेल्या शेंगा व काढलेले तेल फॅब्रिकेटर्स व्यवसायासाठी आणलेल्या लोखंड, ट्रॅक्टर ट्रॉली व शेड इमारत आगीच्या भक्षस्थानी पडले.

दोन व्यक्तींचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद गेल्या काही वर्षात सुतार बंधूनी येथे शिवराम ट्रॅक्टर ट्रॉली बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आगीची सुरुवात पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी दाखवत असून त्यानंतर हा कॅमेराही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी तेथे दोन व्यक्तींचा वावर असल्याचे अस्पष्ट दिसते असे सुतार बंधू यांनी सांगितले. घटनेच्या रीतसर पंचनामा सकाळी झाला.

एकंदरीत नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सकाळपासून घटनास्थळी कुदनूर परिसरातील शेकडो नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. घटनास्थळी माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील तसेच अन्य राजकीय व्यक्तींनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग