फिरस्त्याचा वृत्तपत्र विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:05+5:302021-07-04T04:18:05+5:30
कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात वृत्तपत्र विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी फिरस्त्यास शनिवारी अटक ...

फिरस्त्याचा वृत्तपत्र विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला
कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात वृत्तपत्र विक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी फिरस्त्यास शनिवारी अटक केली. जयसिंगराव भिकू भांबुरे (वय ७७, रा. जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे, तर अटक केलेल्या फिरस्त्याचे नाव महंमद सय्यद (वय ४८)असे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयसिंगराव भांबुरे हे वृत्तपत्र विक्रेते असून ते शुक्रवारी दुपारी भवानी मंडप परिसरात वृत्तपत्र विक्री करीत बसले होते, त्यावेळी महंमद सय्यद हा फिरस्ता तेथे आला. त्याने भांबुरे यांच्याकडे जेवणासाठी पैसे मागितले. त्यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्या रागातून फिरस्त्याने त्यांची गळपट पकडून त्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे भांबुरे तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे जात होते, त्याच वेळी संशयित फिरस्ता सय्यद याने अचानक पाठीमागून येऊन धारदार हत्याराने त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला. हल्ल्यात भांबुरे जखमी झाले. त्यांच्या गालावर व डोक्यात खोलवर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर संशयित तेथून पळून गेला. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली.
फोटो नं. ०३०७२०२१-कोल-महंमद सय्यद (आरोपी)
030721\03kol_5_03072021_5.jpg
फोटो नं. ०३०७२०२१-कोल-महम्मद सय्यद (आरोपी)