पानसरेंंच्या मारेकऱ्यांना तातडीने शोधा
By Admin | Updated: February 25, 2015 00:07 IST2015-02-24T23:48:53+5:302015-02-25T00:07:17+5:30
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

पानसरेंंच्या मारेकऱ्यांना तातडीने शोधा
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपोषणात भाग घेतला. पानसरे दाम्पत्यावर हल्ला होऊन नऊ दिवस झाले तरी मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मारेकऱ्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. मारेकरी हल्ला करून पसार होतात हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. शक्य तितक्या लवकर मारेकऱ्यांना पकडण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे हे उपोषण करण्यात आले. उपोषणात आर. के. पोवार, अनिल साळोखे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, प्रदीप पाटील-भुयेकर, सुनील परीट, मुनीर शेख, सतीश बन्ने, मुस्ताक सौदागर,अविनाश चौगुले, किरण इंगवले, रोहित पाटील, अवधूत अपराध, हंबीरराव पाटील,
शंकरराव डोंगळे, आप्पासाहेब धनवडे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)