आगीत जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:54+5:302021-08-22T04:27:54+5:30
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील दिनकर व तानाजी धोंडीराम दबडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून जनावरे दगावली ...

आगीत जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील दिनकर व तानाजी धोंडीराम दबडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून जनावरे दगावली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वारणा दूध संघाचे अर्थसहाय्य मिळाले.
वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे यांच्या हस्ते धनादेश दिला. सरपंच रायबाराजे शिंदे, उपसरपंच उल्हास वाघमारे,संस्थेचे उपाध्यक्ष विजय तोडकर, सचिव नारायण कापसे, संचालक भीमराव सूर्यवंशी शामराव सूर्यवंशी, शामराव गुरव, आत्माराम वाघमारे, अण्णा शिंदे, अरुण भोसले, दिलीप बंडगर, कोंडीराम जाधव, भीमराव शिंदे, शिवाजी बोरुडकर उपस्थित होते.
फोटो ओळी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे जनावरे जळीत सानुग्रह अनुदानाचा धनादेश शेतकऱ्यांना देताना वारणा बँकेचे माजी संचालक हंबीरराव शिंदे सोबत संचालक मंडळ उपस्थित होते.
(छाया: रोहन तोडकर)