कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्यातील ९ लाख १७ हजार नोंदीत कामगारांच्या खात्यात अवघ्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखाचा निधी जमा केल्याची माहीती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रूपयाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार राज्यातील नोंदीत १३ लाख कामगारांपैकी ९ लाख १७ हजार कामगारांना मदत दिलेली आहे. मागील वर्षी कोरोना काळात कामगारांना पाच हजार रूपये मदत दिली होती.कडक निर्बंधांमुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन त्यांना मदतीचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना मध्यान्ह व रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे परप्रांतीय बांधकाम कामगारांनी स्थलांतर करू नये असे आवाहनही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
राज्यातील ९ लाख बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य : मुश्रीफ यांची माहीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:38 IST
CoronaVirus HasanMusrif Kolhapur : कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्यातील ९ लाख १७ हजार नोंदीत कामगारांच्या खात्यात अवघ्या चार दिवसात १३७ कोटी ६१ लाखाचा निधी जमा केल्याची माहीती राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
राज्यातील ९ लाख बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य : मुश्रीफ यांची माहीती
ठळक मुद्देराज्यातील ९ लाख बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य, हसन मुश्रीफ यांची माहीती चार दिवसात १३७ कोटी निधी थेट मजूरांच्या खात्यात जमा