फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची काळे फासून काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 03:38 IST2020-08-15T03:38:49+5:302020-08-15T03:38:52+5:30

छत्रपती शासन संघटनेच्या प्रमुख दिव्या मगदूम यांच्यासह पंधरा जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल

Finance staff face blackened | फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची काळे फासून काढली धिंड

फायनान्सच्या कर्मचाऱ्यांची काळे फासून काढली धिंड

कोल्हापूर : घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे वसुलीसाठी केलेल्या फोनदरम्यान बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाºयाने अश्लील भाषा वापरल्यामुळे महिलांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बजाज फिनसर्व कंपनीच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. सात कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची कार्यालयापासून शाहूपुरी पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली.

याप्रकरणी कंपनीचे अधिकारी राहुल बसवाणी हसबे यानी फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी छत्रपती शासन संघटनेच्या प्रमुख दिव्या मगदूम यांच्यासह पंधरा जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. करवीर तालुक्यातील नंदवाळमधील महिलेला फायनान्सच्या कर्मचाºयाने कर्जवसुलीसाठी फोन केला.महिलेने पैसे नसल्याचे सांगताच अश्लील भाषा वापरल्याची तक्रार आहे.

Web Title: Finance staff face blackened