शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

तीन वर्षापासून रखडलेल्या चित्रकर्मी पुरस्कारांना अखेर मुहूर्त

By admin | Updated: April 29, 2017 18:19 IST

जोशी, नरुले, गंगावणे, रकटे यांच्यासह १६ कलावंतांचा होणार सन्मान

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गीत लेखक श्रीकांत नरुले, पटकथा लेखक प्रताप गंगावणे अभिनेते विलास रकटे, यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील १६ कलावंत व तंत्रज्ञांना त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने दिले जाणारे चित्रकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहीती शनिवारी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा पुरस्कार यंदा ५ मे रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. २०१४ पासून काही तांत्रिक कारणामुळे हा पुरस्कार खंडीत झाला होता. तीन वर्षाचा कालावधी धरुन या पुरस्काराने चित्रकर्मींचा सन्मान करण्यात येणार आहे. मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार व शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुणे, मुंबई, उर्वरित महाराष्ट्रासाठी नाशिक किंवा सोलापूर येथेही या पुरस्काराचे वितरण स्वतंत्रपणे होणार आहे. या पुरस्कार समारंभात स्थानिक कलाकारांना मनोरंजनाचे कार्यक्रम करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानूसार कोल्हापूरातील कार्यक्रमासाठी कलादिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक स्थानिक कलाकारांकडून तयारी करुन घेत आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, गीत लेखक श्रीकांत नरुले, पटकथा लेखक प्रताप गंगावणे, ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक विलास रकटे,जगदीश पाटणकर, सांगली(निर्माता, दिग्दर्शक, लेखक), अभिनेत्री गीताबाई वंटमुरीकर,प्रकाश शिंदे (छायाचित्रण), अशोक पेंटर (कलादिग्दर्शक ),अशोक उर्फ प्रकाश निकम ( ध्वनीरेखक अभिनेत्री गीताबाई वंटमुरीकर, सिद्धू गावडे (निर्मिती व्यवस्थापक ), रंगभूषाकार शशी यादव, वेशभूषाकार कमल पाटील, किसन पोवार (लाईटमन-सहा.छायाचित्रण), कृष्णात चव्हाण (लाईटमन विभाग), विजय कल्याणकर(कामगार) यांचा,तर स्वर्गीय बजरंग रामचंद्र भोसले (वाईकर)यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, प्रमुख कार्यवाह रणजित जाधव, शरद चव्हाण, सतीश बिडकर, संजय पिंपळे, व्यवस्थापक रविंद्र बोरगांवकर ,भरत दैनी, सागर बगाडे, संग्राम भालकर, अर्जुन नलवडे, अरुण चोपदार आदी उपस्थित होते.