अखेर कसबा तारळेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST2021-05-22T04:23:28+5:302021-05-22T04:23:28+5:30

अखेर कसबा तारळेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : ‘लोकमत’च्या वृत्ताने प्रशासन झाले खडबडून जागे लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे ...

Finally, strict implementation of lockdown in Kasba Tarle | अखेर कसबा तारळेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

अखेर कसबा तारळेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

अखेर कसबा तारळेत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : ‘लोकमत’च्या वृत्ताने प्रशासन झाले खडबडून जागे

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा तारळे : ‘लोकमत’मध्ये आज (शुक्रवार) प्रसिद्ध झालेल्या ‘कसबा तारळेत ग्रामस्थ बेफिकीर’ या मथळ्याखालील बातमीने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कडक लॉकडाऊन करत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांना पोलिसी खाक्या तर दाखवलाच शिवाय व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग सुरु असून, बाधित रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्या अनुषंगाने गेल्या शनिवारी (दि. १५)पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत दवाखाने, औषध दुकाने, दूध संकलन वगळता सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान, कसबा तारळेत लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आल्याचे चित्र होते. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांचा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत वावर सुरू होता तर काही व्यापाऱ्यांचा मागील दाराने व्यवसाय सुरू होता.

दरम्यान, या संदर्भात ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी ‘कसबा तारळेत नागरिक बेफिकीर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले आणि या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सकाळपासूनच दुर्गमानवाड फाटा, शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ आदी ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत विनाकारण, विनामास्क फिरणारे दुचाकीस्वार, व्यापारी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच काहींना पोलिसी खाक्याही दाखवला. या कारवाईत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस सहभागी झाले होते.

फोटो कॅप्शन - दुर्गमानवाड फाटा येथे दुचाकीस्वाराची कसून चौकशी करताना पोलीस.

Web Title: Finally, strict implementation of lockdown in Kasba Tarle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.