अखेर हुपरीला नगरपालिका

By Admin | Updated: July 31, 2015 01:20 IST2015-07-31T01:20:47+5:302015-07-31T01:20:47+5:30

मुख्यमंत्र्यांची मंजुरी : कृती समितीच्या लढ्यास यश

Finally Hupriya Nagarpalika | अखेर हुपरीला नगरपालिका

अखेर हुपरीला नगरपालिका

हुपरी : कृती समितीच्या लढ्याची दखल घेऊन हुपरी येथे नगरपालिका स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी मुंबईहून दूरध्वनीद्वारे सांगितले. यावेळी आमदार सुजित मिणचेकर व आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते.
जनआंदोलनाद्वारे नगरपालिका मंजूर करून घेण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रसंग आहे. नगरपालिका मंजुरीची माहिती मिळाल्यानंतर हुपरीत जल्लोष करण्यात आला. चंदेरीनगरी म्हणून संपूर्ण देशात हुपरी प्रसिद्ध आहे. ६0 हजार लोकसंख्येच्या या गावाला ग्रामपंचायतीला नागरी सुविधा देण्यात अपयश आले आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून हुपरी नगरपालिकेची मागणी शासन दरबारी सुरू आहे. मात्र, मागणीसाठी गावातील सर्व पक्ष व संघटनांबरोबर युवकांनी कृती समितीच्या माध्यमातून लोकचळवळ उभी केली. यासाठी लक्षणीय उपोषण, सह्यांची मोहीम याद्वारे तीव्र लढा उभारण्यात आला. तबल १५ दिवस उपोषण व तीन दिवस बेमुदत उपोषणाद्वारे शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर कृती समितीने शासन दरबारीही प्रयत्न केले.
...आणि मुख्यमंत्र्यांनी
स्वाक्षरी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आमदार सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर यांनी बैठकीचे आयोजन केले. निमंत्रक अमजद नदाफ, सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, माजी सरपंच दौलतराव पाटील, ‘भाजप’चे सुदर्शन खाडे, बाळासो रणदिवे, ‘शिवसेने’चे रघुनाथ नलवडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे यांचे शिष्टमंडळ बैठकीस उपस्थित होते. आमदार हाळवणकर व आमदार मिणचेकर हे कार्यक्षम आमदार असून, त्याचा पाठपुरावा व कृती समितीचा लढा यामुळे हुपरी नगरपालिकेस मंजुरी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून प्रस्तावावर स्वाक्षरी करीत हुपरीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले.
त्यानंतर हुपरी नगरपालिका मंजुरीची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हुपरीत एकच जल्लोष सुरू झाला.
गेल्या तीन दिवसांपासून अशोक खाडे, अमोल देशपांडे, विनोद खोत, उदय शिंदे, महादेवराव पाटील, पृथ्वीराज गायकवाड, आनंदराव कांबळे, मुबारक शेख, डॉ. सुभाष मघाळे, शहाबुद्दीन घुडुबाई, सुनील कोरे, बाबासो गायकवाड, प्रवीण कुंभोजकर, मनोज पाटील, वसंत कांबळे, वसंत वराळे, प्रकाश माळी, जीवन नवले, सौ. सुखसारे,
विलास चव्हाण, आदी उपोषणास बसले होते.
हुपरीकरांंचे नगरपालिकेचे स्वप्न युती शासनाने सत्यात उतरल्याने
कृती समितीने शासनाचे आभार मानले. हुपरीतील सर्वपक्षीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी व विविध मंडळे, संघटना यांनी या जनआंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Finally Hupriya Nagarpalika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.