रमेश जारकीहोळींच्या विरोधात अखेर ‘त्या’ युवतीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:09+5:302021-03-27T04:26:09+5:30
तक्रार दाखल करू नये म्हणून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावाही युवतीने केला आहे. पी़डित युवतीने स्वहस्ताक्षरात ...

रमेश जारकीहोळींच्या विरोधात अखेर ‘त्या’ युवतीची तक्रार
तक्रार दाखल करू नये म्हणून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावाही युवतीने केला आहे.
पी़डित युवतीने स्वहस्ताक्षरात लिहिलेली तक्रार वकील जगदीश यांनी पोलीस आयुक्तांच्या दाखल केली आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कमलपंत यांनी सदर तक्रार कब्बन पार्क पोलीस ठाण्यात नोंदविण्यात यावी, अशी सूचना वकील जगदीश यांना केली. त्यामुळे आता या वादग्रस्त सीडी प्रकरणी कब्बन पार्क पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
गेल्या २४ दिवसांपासून आपल्या जिवाला धोका होता आणि यापुढील काळातही असल्याचे दिसते. सर्व पक्षाचे नेते, सर्व संघटना, राज्यातील जनता माझे समर्थन करत आहेत. यामुळे मला धैर्य व प्रोत्साहन मिळाले आहे. या प्रोत्साहनामुळे मी शुक्रवारी दुपारी वकिलामार्फत तक्रार दाखल केल्याचे पीडितेने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. आतापर्यंत या युवतीने तीन व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.
या युवतीने केलेल्या लिखित तक्रारीत, आपल्याला सरकारी नोकरी देण्याचे सांगून लैंगिक संबंध ठेवून व्हिडिओ कॉलमार्फत अश्लील बोलणी केली आहेत. कर्नाटक राजभवनातून व्हिडिओ कॉल करून नग्नावस्थेत आपल्याला कॉल करायला लावला. शरीरसंबंध ठेवले आणि त्यानंतर कामाच्या ऐवजी पैसे देईन असे सांगितले. यावेळी जाब विचारला असता अश्लील शब्द वापरून मला हाकलून देण्यात आले. आणि यानंतर सदर व्हिडिओ व्हायरल झाला. माझ्या जिवाला धोका असून, माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचा जीवही धोक्यात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा मिळावी, असे आवाहनदेखील युवतीने केले आहे.