शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 17:47 IST

कोल्हापूर येथील विमानतळावरील एक महत्त्वाची सुविधा असणाऱ्या नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथील विमानसेवेला अधिक गती मिळणार आहे. कोल्हापूर विमानतळ येथून तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देविमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यातमहिन्याभरात होणार पूर्ण; सेवेला मिळणार गती

कोल्हापूर : येथील विमानतळावरील एक महत्त्वाची सुविधा असणाऱ्या नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथील विमानसेवेला अधिक गती मिळणार आहे.कोल्हापूर विमानतळ येथून तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत सध्याची धावपट्टी ९७० मीटरने वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. विमानतळ विकास आराखड्यातील संरक्षक भिंतीचे ६५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एटीआर इमारतीचे काम सध्या सुरू आहे.

धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या सुविधेचे काम पूर्ण झाल्यानंतर परवान्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ‘डीजीसीए’च्या पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित परवाना मिळणार आहे. नाईट लँडिंग सुविधा विमानसेवा आणि विमानतळाच्या विकासाला गती देणारी ठरणार आहे.

या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित काम पूर्ण होईल, असे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सोमवारी सांगितले.अबस्ट्रॅकल लाईट लावण्याचे कामविमानाच्या उड्डाण क्षेत्रामध्ये अडथळे ठरत असलेल्या मोबाईल टॉवर, इमारतींवर अबस्ट्रॅकल लाईट लावण्यात येत आहेत. झाडांची उंची कमी करण्यात आली आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला असलेल्या भूमिगत दिव्यांचे काम सध्या करण्यात येत असल्याचे कटारिया यांनी सांगितले. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर