नेसरीची विहीर मोजतेय अंतिम घटका

By Admin | Updated: May 3, 2014 16:59 IST2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T16:59:44+5:30

एकेकाळी नेसरीच्या निम्म्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर स्थानिक पुढार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतिम घटका मोजत आहे.

The final element counting the goodness of Nesari | नेसरीची विहीर मोजतेय अंतिम घटका

नेसरीची विहीर मोजतेय अंतिम घटका

नेसरी : एकेकाळी नेसरीच्या निम्म्या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर स्थानिक पुढार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अंतिम घटका मोजत आहे.
नेसरीची प्रथम नळपाणी पुरवठा योजना झाली ती १९८० च्या दशकात. मात्र, त्याआधी व नंतरसुद्धा याच मदारशा विहिरीनं नेसरीची तहान भागविण्याबरोबरच धुणी धुण्याची सोय करून दिली. गावात ३०-३५ वर्षांपूर्वी प्रत्येक समाजासाठी विहिरी होत्या. मदारशा विहिरीवर मात्र सर्व जाती-धर्मांचे लोक पाणी भरत. घरी वापरण्यासाठी याच पाण्याचा उपयोग होत होता. कपडे धुण्यासाठी तर या विहिरीवर नेहमी गर्दी असायची.
मात्र, कालांतराने या विहिरीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. प्रत्येकाच्या घरी नळ आल्याने व घटप्रभा नदीचे पाणी घरोघरी पोहोचू लागल्याने या विहिरीचा एक एक रहाट कोसळू लागला. पक्क्या दगडी बांधकामाची विहीर केव्हा जमीनदोस्त झाली, हे कळायला व समजून घ्यायला स्थानिक पुढार्‍यांना फुरसतही मिळाली नाही. त्यामुळे एकेकाळी मोठ्या दिमाखाने उभी राहिलेली व नेसरीच्या वैभवात भर घालणारी ही विहीर आता भकास झाली आहे. त्याचे सर्व कठडे विहिरीत कोसळले आहेत. मोठमोठे दगड विहिरीत बघताना प्रत्येक बुजुर्गाच्या मनात व समोर उभी राहते ती पूर्वीची मदारशा विहीर.
विहिरीवर तीन रहाट होते. त्याचा आवाज केव्हाच थांबला. आता फक्त उरल्या आहेत आठवणी. शासन व स्थानिक पुढार्‍यांनी वास्तवीक या नेसरीच्या ठेव्याकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. (वार्ताहर)

Web Title: The final element counting the goodness of Nesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.