‘सारथी’साठी १००० कोटी निधीबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:22+5:302021-06-20T04:18:22+5:30
या बैठकीत राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून कोल्हापुरातही उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची ...

‘सारथी’साठी १००० कोटी निधीबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय
या बैठकीत राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून कोल्हापुरातही उपकेंद्र सुरू करण्यासाठी नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या बैठकीत निर्देश दिले. ‘सारथी’ लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख असून त्यात एक लाखाच्या आत, तीन लाखांच्या आत, तीन ते पाच लाखांच्या आत व पाच ते आठ लाखांच्या आत असे टप्पे तयार केले आहेत. वसतिगृह उभारणी, सारथीमधून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा, प्रशिक्षण, संशोधन, आदी उपक्रम राबविण्याच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या. अभ्यासक्रमनिहाय ‘सारथी’कडून दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाची टक्केवारी ठरविण्यात येणार आहे. ‘सारथी’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथाची छपाई करून त्याचे तत्काळ वितरण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. यासह सारथीला एक हजार कोटींच्या निधीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, संजीव भोर, अंकुश कदम, विनोद साबळे, राजेंद्र कुंजीर, सचिन अडेकर, महादेव तळेकर, रघुनाथ चित्रे पाटील व अन्य समन्वयक उपस्थित होते.
फोटो : १९०६२०२१-कोल-सारथी
ओळी : मराठा समाजाच्या मूक आंदोलनाची दखल घेऊन सारथी संस्थेविषयी शनिवारी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार संभाजीराजे यांच्यात बैठक झाली.