शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते वैभववाडी राष्ट्रीय महामार्गाला अंतिम मंजुरी, सांगली ते पेठ नाका मार्ग होणार चौपदरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 21:12 IST

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्'ांतून जाणाºया नव्या दोन राष्टÑीय महामार्गांना राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली.

ठळक मुद्देकोकणशी दळणवळण करण्यास सोयीस्कर होणारतावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडणार

तानाजी पोवार

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्'ांतून जाणाºया नव्या दोन राष्टÑीय महामार्गांना राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने सोमवारी अंतिम मंजुरी दिली. कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडीमार्गे तळेरे (जि. सिंधुदुर्ग) तसेच सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असे हे दोन नवे राष्टÑीय महामार्ग होत आहेत. हे दोन्हीही मार्ग संपूर्ण सिमेंट काँक्रिटचे असतील. यामुळे मुंबई ते गोवा आणि रत्नागिरी ते नागपूर हे दोन्हीही राष्टÑीय महामार्ग पुणे ते बंगलोर (एनएच ४) या राष्टÑीय महामार्गाला जोडले जाणार आहेत. या दोन्हीही नव्या रस्त्यांमुळे दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर राज्याला फायदा होणार आहे.

कोकणमधील व्यापाºयाला चालना मिळावी या उद्देशाने राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाच्यावतीने कोकण पुणे ते बंगलोर राष्टÑीय महामार्गाला जोडण्याचा प्रस्ताव विचारधीन होता. त्याबाबतचा विकास आराखडा तयार करून तो मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी तत्त्वत: मंजुरी घेण्यात आली होती. त्यावर सोमवारी राष्टÑीय रस्ते विकास महामंडळाने अंतिम मंजुरीची मोहोर उमटवली.

सध्या कोल्हापूर, गगनबावडा, वैभववाडी ते तळेरे (जि. सिंधुदुर्ग) हा रस्ता राज्य महामार्ग असून त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. कोकणला जोडणारा हा प्रमुख महामार्ग गणला जातो, पण या रस्त्याची रुंदी खूपच कमी असल्याने येथे अनेक अपघातांना निमंत्रण दिले जाते. हा महामार्ग मुंबई ते गोवा (एनएच ६६) राष्टÑीय महामार्गाला जोडला जातो, पण याच रस्त्याला राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मान्यता देण्यात आली असून तो चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तळेरे येथून सुरू होणारा हा रस्ता कोल्हापुरात तावडे हॉटेलनजीक पुणे ते बंगलोर या राष्टÑीय महामार्गाला जोडणार आहे. या नव्या रस्त्याचा नंबर ‘१६६ जी’ असा असेल.

याशिवाय दुसरा नवा मार्ग हा सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) असा असून त्याचा नंबर ‘१६६ एच’ असा असेल. हा मार्गही चौपदरीकरण करण्यात येणार असून तो रत्नागिरी ते नागपूर या राष्टÑीय महामार्गाला मिरज येथे जोडला जाणार आहे. या दोन्हीही नव्या राष्टÑीय महामार्गामुळे कोकणशी दळणवळण करण्यास सोयीस्कर होणार आहे.

या नव्या मार्गांना अंतिम मंजुरी मिळाल्यामुळे आता त्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.दोन्हीही राष्टÑीय महामार्ग सिमेंट काँक्रिटचेराष्टÑीय रस्ते विकास महामंडळामार्फत अंतिम मंजुरी मिळालेले हे नवे दोन्हीही राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण होणार असून ते सिमेंट काँक्रिटचे असतील. हे रस्ते निर्माण करणाºया ठेकेदाराला त्याच्या देखभालीची जबाबदारी ठरावीक वर्षासाठी देण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरावर वाहतुकीचा भार वाढणारहे दोन्हीही नवे मार्ग रत्नागिरी ते नागपूर तसेच गोवा ते मुंबई या मार्गांना जोडले जाणार असल्याने त्यावरील वाहतुकीचा भार हा कोल्हापूर शहरावर आणि पुणे ते बंगलोर या मार्गावर पडणार आहे. 

फुलेवाडीपर्यंत चौपदरीकरणतळेरे, वैभववाडी, गगनबावडा ते कोल्हापूर हा रस्ता पूर्ण सिमेंट काँक्रिटचा असून तो फुलेवाडीपर्यंत चौपदरी, तर तेथून तो तावडे हॉटेलपर्यंत दुपदरी असेल. 

गेले काही वर्षे चर्चेत असणारे तळेरे ते गगनबावडा मार्गे कोल्हापूर आणि सांगली ते पेठ नाका (इस्लामपूर) या दोन्हीही राज्य महामार्गांना राष्टÑीय महामार्ग म्हणून अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्याच्या चौपदरीकरण कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.-व्ही. आर. कांडगावे, मुख्य कार्यकारी अभियंता, राष्टÑीय रस्ते महामार्ग, कोल्हापूर 

 

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी