ऑनलाईन शिक्षण असेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:26+5:302021-07-05T04:15:26+5:30

या ऑनलाईन शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत भरविण्यात याव्यात. त्यामुळे पालकांचे मोबाईल सकाळच्या सत्रात मुलांना वापरता येतील. एकाच ...

Fill the school morning session as long as there is online learning | ऑनलाईन शिक्षण असेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवा

ऑनलाईन शिक्षण असेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवा

या ऑनलाईन शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत भरविण्यात याव्यात. त्यामुळे पालकांचे मोबाईल सकाळच्या सत्रात मुलांना वापरता येतील. एकाच घरात दोन विद्यार्थी असल्यास त्यांना आई आणि वडील या दोघांच्याही मोबाईलचा वापर करून ऑनलाईन शिक्षण घेता येईल. सकाळी दिलेले शिक्षण हे अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना समजू शकते. सकाळच्या सत्रात ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थ्यांकडून ९० टक्के प्रतिसाद मिळत होता. हाच प्रतिसाद सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळेत शाळा केल्यास ६० टक्क्यांवर आल्याचे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ होण्यासाठी शाळा सकाळी भरविणेचे आदेश काढावेत, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Web Title: Fill the school morning session as long as there is online learning