घरफाळा भरा, अन्यथा मिळकतींवर बोजा
By Admin | Updated: November 13, 2014 00:00 IST2014-11-12T23:51:43+5:302014-11-13T00:00:42+5:30
थकबाकीदारांना दम : बड्या मिळकतधारकांची झाली सुनावणी

घरफाळा भरा, अन्यथा मिळकतींवर बोजा
कोल्हापूर : शहरातील १ लाख ३४ हजार मिळकतींच्या घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ३५ ते ४० कोटींची भर पडते. एलबीटीनंतर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या घरफाळा थकबाकीदारांना चाप लावण्यासाठी थकीत दंड १८ टक्क्यांवरून २४ टक्के करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. आता बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींवर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, बुधवारी १५ बड्या थकबाकीदारांची सुनावणी झाली. ‘घरफाळा भरा, अन्यथा कारवाईस सामोरे जा’ असा इशाराच महापालिकेने थकबाकीदारांना दिला. वेळेत घरफाळा न भरणाऱ्यांवर १८ टक्के दंड आकारला जातो. महाराष्ट्र महापालिका अधिनियमन कराधन प्रकरण ८, नियम ४१ च्या नव्या तरतुदीनुसार वेळेत मिळकत कर न भरणाऱ्यांवर दरमहा दोन टक्के दंडाची रक्कम आकारण्याची परवानगी आहे. ९० दिवसांत बिल न भरणाऱ्यांवर दंड आकारणी सुरू केली. लवकरच ई वॉर्डातील थकबाकीदारांची सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
सुनावणी झालेले....
बाबूराव सूर्यवंशी, बापूसो सूर्यवंशी, शोभा बामणे, बापू कदम, निकम अँड निकम, कृष्णा गणेशाचार्य, संजय पाटील, प्रिन्स शिवाजी संस्था, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, सिंडिकेट बॅँक, राजर्षी शाहू शिक्षण संस्था, विशेष भूमी संपादन अधिकारी, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन, विद्यापीठ तपोवन, शिक्षक प्रसारक संस्था.