युवकावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:55 IST2017-07-18T22:55:02+5:302017-07-18T22:55:02+5:30
संबंधित युवती पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. दरम्यान आज गाडवे यांचा वाढदिवस होता

युवकावर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल
पेठवडगाव : सोशल मिडीयाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणार्या तरूणीस एकतर्फी प्रेमातून त्रास देणार्या मौजे तासगाव येथील एका युवकावर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संदीप सुनिल गाडवे (वय २१) असे गुन्हा नोंद झालेल्यांचे नाव आहे. पिडीत तरुणीच्या वडिलांनी आज पोलिसांत फिर्याद दिली. गाडवे यांच्या वर यापुर्वी ९ मे २०१७ देखील विनयभंगाचा गुन्हा नोंद होता.आज याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विनयभंगाचा दुसयार्दा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी सांगितले की, येथील एका हायस्कूलमध्ये गाडवे व पिडीत मुलगी एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हा पासून गाडवे हा एकतर्फी प्रेमातुन त्रास देत होता. याबद्दल ९ मे ला गाडवे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. संबंधित युवती पुणे येथे उच्च शिक्षण घेत आहे. दरम्यान आज गाडवे यांचा वाढदिवस होता त्यामुळे दोघांचा एकत्रित फोटो सोशल मिडीयाच्या ( व्हाट्स अँप डिपी व फेसबुकवर) कव्हर पेज ठेवला. या माध्यमातून गाडवे तिचा पिच्छा करून सतावत असल्याने पिडीत मुलगीच्या वडीलांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी महिला विषयी अपराध कायद्यातील नविन सुधारणेनुसार महिलेचा कोणत्याही पद्धतीने पिच्छा, पाठलाग करणे अपराध आहे. तसेच पाठलाग हा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साह्याने केला असल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा गुन्हा नोंद केला. तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत. चौकट- फेसबुक, व्हाट्स अँप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांना कोणी त्रास देत असेल तर स्थानिक पोलीसाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव केले आहे.