शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रायनपाडा हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:41 IST

रायनपाडा (ता. साकी, जि. धुळे) येथे झालेल्या निरपराध डवरी समाजाच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देरायनपाडा हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करानाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेची निदर्शने

कोल्हापूर : रायनपाडा (ता. साकी, जि. धुळे) येथे झालेल्या निरपराध डवरी समाजाच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी नाथपंथी डवरी गोसावी समाज संघटनेतर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकासमोर निदर्शने करीत ठिय्या मारला. या ठिकाणी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, ग्रामपंचायत इमारतीमध्ये निरपराध लोकांचे हत्याकांड झाले असून, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायतच बरखास्त करावी. हत्याकांडातील बळी पडलेल्या कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे व प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपये मदत द्यावी. तसेच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे.

दारोदारी फिरून परंपरागत व्यवसाय करणाऱ्या या समुदायास संरक्षण मिळावे, विनाकारण संशयाने त्यांचा छळ होणार नाही, याची शासनाने खबरदारी घ्यावी. या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. या निवेदनाची प्रत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, मुख्यमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना पाठवावी, अशी विनंती करण्यात आली.आंदोलनात संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ शिंदे, कालिदास शिंदे, शंकर बाबर, बानू इंगवले, विकास बुरुंगले, यशवंत इंगवले, शिवाजी भोसले, दादा शिंदे, दिनकर भोसले, आदी सहभागी झाले होते.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर